शिक्षा

शिक्षा

03638

अल्पवयीन मुलींचा विनयभंग;
एकास सात वर्षे सक्त मजुरी

आरोपी सांगली जिल्‍ह्यातील

कोल्हापूर, ता. १८ ः दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस एकूण सात वर्षे सक्तमजुरी आणि साडेचौदा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. महेश रघुनाथ पाटील (वय ४८, रा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जि. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. येथील ज्यादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी आज ही शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकिल अमिता.ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले. २०१८ ला याबाबात वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना स्वतः बरोबर घेवून जाण्यासाठी घरात जावून हात धरला. तसेच खुणावून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्यामुळे आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तसेच पिडिताच्या लहान बहिणीवरही त्याने अत्याचार केल्यामुळे पोलिसांकडून बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम ७, ८ प्रमाणे गुन्हा नोंदवणला होता.
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर विशेष सरकारी वकील कुलकर्णी यांनी एकुण सात साक्षीदार तपासले. फिर्यादी, पिडीत मुलगी व इतर साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर अखेर न्यायालयाने आरोपींस वेगवेगळ्या गुन्हयात दोषी ठरवून शिक्षा सुनावली. दंड न भरलेस आरोपीस १७ महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पिडीतांना देण्याचे आदेशही दिले आहेत.
वडगाव पोलिस ठाण्याचे हावलदार शशिकांत मेतके, पैरवी अधिकारी मिलिंद टेळी, व पोक्सो पैरवी अधिकारी महिला पोलिस हवालदार माधवी घोडके यांनी विशेष सरकारी वकिलांना सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com