प्रभारी कुलसचिवांनी उत्तरे द्यावीत, नाही तर राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभारी कुलसचिवांनी उत्तरे द्यावीत, नाही तर राजीनामा
प्रभारी कुलसचिवांनी उत्तरे द्यावीत, नाही तर राजीनामा

प्रभारी कुलसचिवांनी उत्तरे द्यावीत, नाही तर राजीनामा

sakal_logo
By

‘प्रभारी कुलसचिवांनी उत्तरे
द्यावीत, नाही तर राजीनामा’

कोल्हापूर, ता. १८ ः अधिकार मंडळाच्या निवडणुका विलंबाने घेणे, अधिसभा निवडणुकीची नियमबाह्य काढलेली नोटीस, सेवकांच्या रजा नियमबाह्य खर्ची टाकणे, अधिकार पदाचा गैरवापर करणे, याबाबतच्या आमच्या प्रश्‍नांची उत्तरे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी द्यावीत, नाही तर उपकुलसचिवपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मगदूम यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे केली. विद्यापीठ सेवकांवर अन्याय होऊ नये. नियमानुसार प्रश्‍नावर अधिकाऱ्यांनी न्याय दिलाच पाहिजे, याबाबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना ४ मे रोजी पत्र दिले. आम्ही उपस्थित केलेल्या न्याय प्रश्‍नी प्रभारी कुलसचिवांनी आमच्यासमोर उत्तरे द्यावीत, अशी मागणी करून १३ मेपूर्वी आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती केली. परंतु, याप्रकरणी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आम्ही याबाबतचे माहितीपत्रक आज प्रसिद्ध केले असल्याची माहिती मगदूम यांनी दिली.

कोट
विद्यापीठ कर्मचारी संघाचे पत्रक माझ्यापर्यंत आलेले नाही. हे पत्रक पाहिल्यानंतर त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.
-डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रभारी कुलसचिव