शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेच्या पुरस्कारांचे सोमवारी वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेच्या पुरस्कारांचे सोमवारी वितरण
शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेच्या पुरस्कारांचे सोमवारी वितरण

शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेच्या पुरस्कारांचे सोमवारी वितरण

sakal_logo
By

डॉ. रमेश जाधव 09711
-
03672
-
03673
................
लोगो -शिवाजी विद्यापीठ
..............

समाजशास्त्र परिषदेच्या
पुरस्कारांचे सोमवारी वितरण

कोल्हापूर, ता. १८ ः शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेने यंदा सहाजणांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि समाजशास्त्रज्ञ डॉ. रमेश जाधव (कोल्हापूर), डॉ. आर. बी. पाटील, डॉ. एन. डी. जत्राटकर, प्रा. सरिता माने (कोल्हापूर), प्रा. सुकुमार अकोळे (सांगली), प्राचार्य व्ही. व्ही. भोसले (सातारा) यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवारी (ता. २२) सकाळी १० वाजता श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात समाजशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. एस. एन. पवार यांच्या हस्ते होणार आहे.
ज्या प्राध्यापकांनी समाज आणि समाजशास्त्र या क्षेत्रातील अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे. त्यांची दखल घेवून त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने समाजशास्त्र परिषदेने गेल्या वर्षापासून या जीवनगौरव पुरस्कारांची सुरूवात केली आहे. यंदा परिषदेच्या १४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सहा प्राध्यापकांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती या परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी दिली. अधिवेशनामध्ये ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि स्त्रिया’ या विषयावर विचारमंथन होणार आहे. अधिवेशनाचे उदघाटन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते होईल. बीजभाषक विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी या असणार आहेत, असे प्रा. सकटे यांनी सांगितले.