‘गाभ’चा कान्स महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गाभ’चा कान्स महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर
‘गाभ’चा कान्स महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर

‘गाभ’चा कान्स महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर

sakal_logo
By

कान्स चित्रपट महोत्सवात
‘गाभ’चा वर्ल्ड प्रिमिअर

कोल्हापूर, ता. १८ : येथील चित्रपट निर्माते मंगेश गोटुरे आणि लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या ‘गाभ’ या मराठी चित्रपटाचा फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर गुरूवारी दुपारी साडेतीन वाजता झाला. या महोत्सवामध्ये ‘गाभ’चा जागतिक प्रिमिअर होणे, हा आमच्यासाठी सर्वाधिक आनंद, समाधानाचा क्षण आहे, अशी भावना निर्माते गोटुरे आणि दिग्दर्शक जत्राटकर यांनी व्यक्त केली.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजार-२०२३’साठी निवडलेल्या सर्वोत्कृष्ट पाच चित्रपटांमध्ये चौथ्या क्रमांकावर ‘गाभ’ होता. तथापि, शासनाच्या वतीने पहिले तीन चित्रपट फिल्म बाजारसाठी पाठविले. त्यामुळे ‘गाभ’चे निर्माते गोटुरे यांनी ‘कान्स मार्श ड्यु फिल्म २०२३’ या विभागासाठी स्वतंत्र प्रवेशिका पाठविली. त्याअंतर्गत आज ‘गाभ’चा जागतिक प्रिमिअर झाला. या विभागांतर्गत प्रिमिअर झालेल्या चित्रपटांमध्ये तीन भारतीय चित्रपट होते. त्यात दिग्दर्शक सुदिश कनौजिया यांच्या ‘ल’वास्टे’ (हिंदी) आणि हैदर काजमी यांच्या ‘बँण्डिट शकुंतला’ (हिंदी), अनुप जत्राटकर दिग्दर्शित ‘गाभ’ (मराठी) या चित्रपटांचा समावेश राहिला. स्वित्झर्लंड व भारत यांची संयुक्त निर्मिती असलेला, दिग्दर्शक कमल मुसळे यांचा ‘मदर तेरेसा अँड मी’ (इंग्रजी) या चित्रपटाचाही समावेश होता. यामध्ये दीप्ती नवल यांची भूमिका आहे.