पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

पाडळी खुर्दला विद्यार्थीनीची आत्महत्या
कोल्हापूर ः पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थीनीने राहत्या घरी आत्महत्या केली. उत्कर्षा संदीप पाटील (वय १७) असे तिचे नाव आहे. तिने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेतला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
पोलिसांनी सांगितले, की उत्कर्षा ही डिप्लोमाच्या पहिल्या वर्गात शिकत होती. अभ्यासाच्या तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून ती अस्वस्थ होती. नातेवाइकांनी तिची समजूतही काढली होती. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. उत्कर्षाने गळफास घेतल्याचा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी सोडविला. तिला सीपीआरमध्ये दाखल केले. दरम्यानच्या काळात तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
-----------
शेडवरून पडून कामगाराचा मृत्यू
कोल्हापूर : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या शेडचे पत्रे बदलताना खाली पडून कामगाराचा मृत्यू झाला. मोहसीन नूरहसन (वय २१, रा. सध्या कागल.मूळ रा. सिकंदरपूर, उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे. सुमारे ५० फूट उंचीवरून तो खाली पडला. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. त्याला सहकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. यावेळी कंपनीतील अधिकारी-कर्मचारी, नातेवाईक उपस्थित होते. सीपीआर पोलिस चौकीत याची नोंद झाली.
............................
पुलाची शिरोलीत सर्पमित्रालाच सर्पदंश
कोल्हापूर : साप पकडताना सर्पमित्रालाच दंश झाल्याची घटना शिरोली पुलाची (ता.हातकणंगले) येथे घडली. सागर पाटील यांच्या घरात साप पकडताना सर्पमित्र सचिन आप्पासो माने (वय ३४, रा. शिरोली पुलाची) यांना सर्पदंश झाला. काल दुपारीही घटना घडली. माने यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, याची नोंद सीपीआर पोलिस चौकात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com