Mon, Sept 25, 2023

हरळीच्या कुटुंबाचा उपोषणाचा इशारा
हरळीच्या कुटुंबाचा उपोषणाचा इशारा
Published on : 19 May 2023, 12:59 pm
हरळीच्या कुटुंबाचा उपोषणाचा इशारा
गडहिंग्लज : भावामधील वाद मिटवून राहण्यासाठी घर मिळावे अशी मागणी हरळी बुद्रूक (ता. गडहिंग्लज) येथील गुरव कुटुंबीयांनी केली आहे. अन्यथा गुरुवारी (ता. २५) तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. तहसिलदारांना याबाबतचे निवेदन दिले आहे. तानाजी हरी गुरव यांचे अतिवृष्टीत घर पडले. त्यानंतर ते भाड्याच्या घरात राहत होते. मात्र, गावच्या यात्रेमुळे त्यांना घरमालकाला घर रिकामे करुन द्यावे लागले. भाड्याने घर घेऊन राहण्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे सध्या उघड्यावरच राहत आहोत. तसेच वडिलांच्या नावे असलेल्या पडक्या घराला वारस लावण्यासाठी अर्ज केला आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी. भावांना बोलवून घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी व आमच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.