जुना पूल वाहतुकीस धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना पूल वाहतुकीस धोकादायक
जुना पूल वाहतुकीस धोकादायक

जुना पूल वाहतुकीस धोकादायक

sakal_logo
By

ich191, 2.jpg
03698
इचलकरंजी : १) जुना पुलावरील असलेली संरक्षक पाईप अनेक ठिकाणी निघून पडली आहे.
03699
२) पुलावर असलेले बिम उखडले आहेत.

जुना पूल वाहतुकीस धोकादायक
इचलकरंजीत लोखंडी पाईप निघून पडल्या; बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याची आवश्यकता
इचलकरंजी, ता. १९ : इचलकरंजी- मलकापूर, हुपरी, यळगुड यासह अन्य गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील जुना पूल दूरवस्थेत आहे. पुलास असणारी संरक्षक पाईप अनेक ठिकाणी निघून पडली आहे. संरक्षण बिंब ही उखडून खराब झाले आहेत. त्यामुळे हे पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहे. तर रात्रीची स्थिती आणखी खराब होत असते. बांधकाम विभागाने अनुसूचित घटना घडण्याची प्रतीक्षा न करिता या जुन्या पूलाची दुरूस्ती करणे आवश्यक बनले आहे.
इचलकरंजी शहराला ग्रामीण भागास जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. पुलावरुन वाहतूक करणाऱ्‍यांच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या लोखंडी संरक्षक पाईप निघून पडल्या आहेत. या पाईपला आधार असलेले सिमेंट पोलही उखडून पडले आहेत. त्यातच पूल संपल्यावर असणाऱ्‍या वळणावर झुडपे वाढली असून तेथे कोणत्याही प्रकारचा संरक्षक कठडा नसल्याने हे वळण अत्यंत धोकादायक बनले आहे. अशा स्थितित सध्या या पुलावरून वाहतूक सुरू आहे. अपघात होवून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पूलाची दुरुस्ती करण्याची गरज असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात आल्याचे दिसत आहे
सांगाव, कागल या मार्गावरील गावांना जाणारी वाहतूक या जुन्या पुलावरून होते. तसेच येथून इचलकरंजी शहरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. परिणामी जुन्या पुलावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पुलाचे रुंदी जेमतेम असून येथून दोन्ही मार्गाने वाहतूक सुरू असते. त्यामुळे पुलास संरक्षण कठडा असणे गरजेचे आहे. बांधकाम विभागाने पुलाचे ऑडिट करून तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
-----------
पुलास साठ वर्षे
इचलकरंजी व पंचगंगा नदी पलीकडील गावांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम १९६५ ते ६७ दरम्यान केले आहे. सुमारे साठ वर्षांचा कालावधी पूर्ण होत असून ऊन, वारा, महापूर याचा मारा सहन करत पुल उभा आहे. आजही पुलाचे बांधकाम भक्कम आहे. मात्र काही ठिकाणी पुलास डागडुजीची आवश्यकता भासत आहे. ती वेळेवर केल्यास आणखी काही वर्षे हा पूल वापरता येणार आहे.