संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनेबाबत

संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनेबाबत

संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनेबाबत
लोकप्रतिनिधींची बैठक घ्या ःसतेज पाटील

कोल्हापूर, ता. १९ः ‘जिल्ह्यातील संभाव्य अतिवृष्टी व पूर परिस्थितीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत तातडीची आढावा बैठक़ घ्यावी. यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनाही सहभागी करून घ्यावे,’ असे पत्र आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार यांना दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून पावसाळ्यामध्ये पूरपरिस्थिती उद्धवली होती. जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कृषी व नागरी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. संभाव्य नुकसान टाळण्याकरिता पूरस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणे आवश्यक आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाचाही प्रभाव जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर पडत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांसोबत योग्य तो समन्वय ठेवणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, तसेच महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता, महावितरणचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवा संचालक, जिल्हा परिषद पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com