शेकाप उद्यान निवेदन

शेकाप उद्यान निवेदन

03811
‘महापालिकेने उद्यानांसाठी निधी द्यावा’
कोल्हापूर, ता. १९ ः शहरातील महापालिकेच्या ५४ उद्यानांसाठी योग्य निधीची तरतूद करण्याबरोबरच शास्त्रोक्त माहिती असलेले तज्ज्ञ कर्मचारी, अधिकारी नेमावेत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, उद्यानात दुर्मिळ औषधी वनस्पतींची जोपासना झाली आहे. उद्यानांमध्ये व्यायाम, फिरणे, योगासने, हास्य क्लबच्या माध्यमातून शहरवासीय आनंद घेत होते. अशी शहराची हृदये असणारी उद्याने यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे भकास होत आहेत.त्यासाठी अपुरे कर्मचारी, सुरक्षा रक्षकांची वानवा, विद्युत यंत्रणेचा अभाव, लहान मुलांची मोडलेली खेळणी व बाकडी, कचऱ्याचे ढिग, पाण्याची दुर्गंधीयुक्त साचलेली डबकी, डासांचे साम्राज्य, दारु- गांजा ओढणारी टोळकी, भटकी जनावरे, साप यांचा वावर वाढला आहे. त्यासाठी निधीची तरतूद करून तज्ज्ञ कर्मचारी व सुरक्षा रक्षक नेमावेत. उद्यानांचा नियोजनबद्घ विकास करावा. याबाबत गांभीर्याने कार्यवाही केली नाही तर लोकशाही मार्गाने लोकचळवळ उभी केली जाईल. यावेळी बाबूराव कदम, सचिन जाधव, डॉ. संदेश कचरे, अस्लम बागवान, संभाजीराव जगदाळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com