जागतिक मधमाशी दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक मधमाशी दिन
जागतिक मधमाशी दिन

जागतिक मधमाशी दिन

sakal_logo
By

फाईल फोटो -

जागतिक मधमाशी दिन विशेष ... लोगो
...

जिल्ह्यात मधाचे उत्पादन पन्नास ते साठ टन

‘मधाचे गाव’ पाटगावातून यंदा तब्बल १६०० किलो मधाचे उत्पादन

कोल्हापूर, ता. १९ : जिल्ह्यात एक, दोन नव्हे तर पन्नास ते साठ टन मधाचे उत्पादन होत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘मधाचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावातून यंदा तब्बल १६०० किलो मधाचे उत्पादन झाले आहे. घेण्यात आले. गतवर्षी ते केवळ ४०० किलो होते. विशेष म्हणजे जिल्ह्यात नोंदणीकृत ८० मधपाळ असून, मधाचा औषधी उपयोग पाहता मध उत्पादन घेण्याकडे कल वाढला आहे.
पश्‍चिम घाटातील पाटगाव, मठगाव, भुदरगड, शाहूवाडी, चंदगड, शिवडाव, अंतुर्ले भागात मधाचे उत्पादन घेतले जाते. जंगलापासून पाच किलोमीटर आतल्या परिसरात मधपेट्या ठेवण्यात येतात. पाटगावात पारंपरिक पद्धतीने मध उत्पादन घेतले जात असून, औषधी वापरामुळे त्याला राज्यभरातून मागणी आहे. पाटगावात पन्नास मधपाळांची नोंद असून, जिल्ह्यातला आकडा ऐंशी आहे.
जंगल भागात राहणाऱ्या लोकांनी मधमाशी पालनातून मधाचे उत्पादन घ्यावे, यासाठी त्यांना जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाकडून अनुदान दिले जात आहे. दहा पेट्या, स्टँड, मध काढण्याचे यंत्र, ड्रम हे साहित्य त्यांना दिले जाते. तसेच पन्नास टक्के अनुदान देण्यासह त्यांना दहा दिवसीय निवासी शिबिरातून मधमाशांच्या वसाहती कशा वाढवायच्या, मधपेटीतून मध कसा काढायचा, तो ड्रममध्ये कसा भरायचा, याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
------------

* मधाचे प्रकार व प्रति किलो दर (रूपयांत)
- कार्वी- १५०० ते २०००
- जांभळ, रानपेरव - ७०० ते ८००
- नाना - ६०० ते ७००
- सोनवेल - ४०० ते ५००
- मोहरी व सूर्यफूल - ३०० ते ४००
- बहुफुलोरावर्गीय - ५००
------------------
कोट -
‘मधमाशी पेटीत वापरण्यात येणारा मेणपत्रा तयार करण्यासाठी वॅक्स शिट मिल मशीन खरेदी केले आहे. या मशिनद्वारे उत्तम प्रतीचा मेणपत्रा तयार करता येतो. जिल्ह्यातील मधपाळांना मेणपत्रा उपलब्ध करणार आहे.

- दयावान पाटील, मधपाळ
---

कोट
‘काकवी व साखरेचे मिश्रण करून मध विकला जातो. तो सेंद्रिय पद्धतीने तयार झालेला नसतो. शहरालगतच्या ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला मधाची बाटलीतून विक्री केली जाते. हा मध हिंसक पद्धतीने तयार केला तर जातोच, शिवाय त्यातून मधमाशांच्या वसाहतींचा नाश केला जातो. ज्यामुळे मधाचा दर्जा ढासळतो.
-
दत्तात्रय कुरूंदवाडे,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी