ऐनापुरात उषा मांगलेंची बाजी

ऐनापुरात उषा मांगलेंची बाजी

gad194.jpg
03801
गडहिंग्लज : ऐनापूर पोटनिवडणुकीत विजयी उमेदवार उषा मांगले यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी विजयाची खूण दाखवत जल्लोष केला. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------------
gad198.jpg :
03802
उषा मांगले, राजश्री कांबळे
-------------------------------------
ऐनापुरात उषा मांगलेंची बाजी
ग्रामपंचायत पोटनिवडणूक; नरेवाडीत राजश्री कांबळे विजयी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उषा मांगले यांनी बाजी मारली. चुरशीच्या वाटणाऱ्या निवडणुकीत त्यांनी एकतर्फी विजय मिळवला. सत्ताधारी आघाडीशी बिनसल्यामुळे राजीनामा दिल्यानंतर त्या पुन्हा पोटनिवडणुकीत विजयी झाल्या आहेत, हे विशेष. नरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील पोटनिवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या राजश्री कांबळे यांनी सहज विजय मिळवला.
ऐनापूर ग्रामपंचायतीची तीन वर्षांपूर्वी पंचवार्षिक निवडणूक झाली. काँग्रेस अंतर्गत कुराडे गटाने सत्ता मिळवली. उषा मांगले यांना सरपंचपदी संधी मिळाली. मात्र, सत्ताधारी आघाडीशी बिनसल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीच्या राष्ट्रवादी पुरस्कृत श्री ईश्वरलिंग समविचारी आघाडीकडून उषा मांगले पुन्हा रिंगणात उतरल्या. काँग्रेसप्रणित ग्रामविकास आघाडीकडून सविता कुराडे यांना उमेदवारी दिली होती. कुराडे गटासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मोठ्या चुरशीने प्रचार व मतदान झाले होते. मात्र, ती चुरस निकालात दिसली नाही. मांगले यांनी ९५ मतांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यांना ३४४ तर सविता कुराडे यांना २४९ मते मिळाली.
नरेवाडीत सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाच्या एका जागेसाठी निवडणूक लागली होती. सत्ताधारी आघाडीकडून राजश्री कांबळे तर गीता कांबळे यांच्यात थेट लढत झाली. जागा सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाची असली तरी दोन्ही उमेदवार अनुसूचित जातीचे होते. एकतर्फी झालेल्या या लढतीत राजश्री कांबळे यांनी तब्बल १४५ मतांनी विजय मिळवला. राजश्री कांबळे यांनी २३१ तर गीता कांबळे यांना ८६ मते मिळाली. दरम्यान, येथील महसूल भवनात सकाळी दहाला दोन्ही पोटनिवडणुकांची मतमोजणी झाली. तहसीलदार ऋषिकेत शेळके, निवडणूक निर्णय अधिकारी किरण खटावकर, एस. एच. जजरवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया झाली. पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com