कोल्हापूर कॅन्सर सेंटर पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर कॅन्सर सेंटर पत्रकार परिषद
कोल्हापूर कॅन्सर सेंटर पत्रकार परिषद

कोल्हापूर कॅन्सर सेंटर पत्रकार परिषद

sakal_logo
By

अनुराधा भोसले यांना भास्कर
लाला जीवन गौरव पुरस्कार

कोल्हापूर, ता. १९ ः कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संस्थापक भास्कर लाला पवार यांच्या सन्मानार्थ सुरू केलेला पहिलाच भास्कर लाला पवार जीवन गौरव पुरस्कार अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले यांना दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. रवी गोडसे यांच्या हस्ते रविवारी (ता. २१) पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अशी माहिती कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक व कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सुरज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पवार म्हणाले, `समाजातील सर्व स्तरातील व अतिगरजूंना कॅन्सरसारख्या दुर्दम्य आजारांवर मोफत व अल्प दरात सुविधा देण्यासाठी भास्कर पवार यांची धडपड होती. अशा व्यक्तीमत्वाच्या नावाने समाजातील वंचितापासून विविध क्षेत्रातील लोकांसाठी तळमळीने काम करून समाजाला पुढे नेणाऱ्या व्यक्तीस भास्कर लाला पवार जीवन गौरव पुरस्कार देण्याचे कोल्हापूर कॅन्सर सेंटरने ठरवले आहे. विविध निकषांनुसार अनुराधा भोसले यांची निवड करण्यात आली. पुरस्कार सोहळा रविवारी (ता. २१) सायंकाळी सात वाजता कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या प्रागणांत होईल. कॅन्सरमधून बरे झालेल्या रूग्णांचा मेळावा व कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा ११ वा वर्धापन दिन असे दोन्ही कार्यक्रम रविवारी सायंकाळी होणार आहेत.’
ऑन्कोलॉजिस्ट डॉ. योगेश अनाप, शाहू कॅन्सर रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिरीष भामरे उपस्थित होते.