पावसाळ्यापूर्वी गटारी पूर्ण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यापूर्वी गटारी पूर्ण करा
पावसाळ्यापूर्वी गटारी पूर्ण करा

पावसाळ्यापूर्वी गटारी पूर्ण करा

sakal_logo
By

ich194.jpg
03832
इचलकरंजी ः विक्रमनगरमधील गटारींची अशी दुरवस्था झाली आहे.

पावसाळ्यापूर्वी गटारी पूर्ण करा
---
विक्रमनगरमधील नागरिकांची महापालिकेकडे मागणी
इचलकरंजी, ता. १९ ः येथील विक्रमनगर परिसरातील गटारींची दुरवस्था झाली आहे. महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने काही दिवसांपूर्वी अनेक गटारी खोदल्या. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील होत आहे. याबाबत नागरिकांनी प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांना निवेदन दिले. यात पावसाळ्यापूर्वी गटारींची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेकडून विक्रमनगर परिसरात गटारी करण्यासाठी मोठे खड्डे खोदले आहेत. पण, गटारीचे काम रखडल्याने त्याचा फटका एका यंत्रमाग कारखान्यास बसला. सूताची बिमे व बाचकी यांची वाहतूक करता येत नसल्याने कारखाना बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याच परिसरात एक शाळा आहे. लवकरच शाळा सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही बाब धोकादायक ठरू शकते. गटारी बुजल्याने पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती निवेदनात व्यक्त केली आहे. निवेदन देताना दीपक पाटील, सागर कुंभार, रेखा आरेकर, सुप्रिया संकपाळ, सुरेंद्र फाटक, अरविंद परीट, बबन आरेकर, मदन माधव, मुसा मोमीन उपस्थित होते.