... आजऱ्यातून एसटी बाहेर पडण्यास तब्बल एक तास

... आजऱ्यातून एसटी बाहेर पडण्यास तब्बल एक तास

... आजऱ्यातून एसटी बाहेर पडण्यास तब्बल एक तास
वाहतूक खोळंबली; प्रवाशांची घालमेल, पोलिस, नगरपंचायतीचे दूर्लक्ष
रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १९ ः आजरा शहरातील ट्रॅफिक जामचा अनुभव काही नवीन नाही. याचा फटका अनेकदा प्रवाशी व पर्यटकांना बसत असतो. आज आजरा- बेळगाव एसटीला शहरातील ट्रॅफिकमधून मार्ग काढताना चालकाला अक्षरक्षः नाकीनऊ आले. तब्बल एक तास एसटीला विलंब लागला. आजरा बसस्थानकातून चार वीस वाजता सुटलेली एसटी पाच वीसला अखेर आजऱ्याहून बेळगावकडे मार्गस्थ झाली. घामाने चिंब भिजलेल्या प्रवाशांची घालमेल झाली.
आजरा शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न अनेक वर्षे अनुत्तरीत आहे. ट्रॅफिकचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघावा, अशी मागणी जनतेतून होत असते. पण अद्याप याबाबत नगरपंचायत व पोलिसांकडून विशेष हालचाल झालेली नाही. मध्यंतरी ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपंचायत व पोलिसांकडून प्रयत्न झाले. पण प्रश्न सुटला नाही. आज मात्र याची हद्दच झाली असे म्हणावे लागले. महागाव रस्त्यावरील कृषी चिकित्सालयापासून ते आजरा मुख्य बाजारपेठेच्या महागाव कोपऱ्यापर्यंत दुतर्फा वाहतूक होती. सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. आज आजऱ्याचा आठवडी बाजार, तीव्र उन्हाळा, त्यात लग्नसराई व यात्रांचा हंगाम यामुळे प्रवाशांचे हाल झाले. चारचाकी गाड्यातील प्रवाशांच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या. गाड्यात उन्हामुळे भाजून निघण्याची वेळ नागरिकांवर आली. दरम्यान आजरा बसस्थानकातून बेळगावकडे सुटलेल्या एसटीला सुमारे एक तासाचा विलंब झाला. थांबत व कुर्मगतीने गाड्या जात होत्या. प्रवाशातून याबाबत तीव्र संतापाची भावना होती.
-----
उन्हाळा तीव्र आहे. अशा काळात वाहतूक कोंडी झाल्यास प्रवाशांचे हाल होतात. आजतर हद्दच झाली. एसटीला आजरा शहरातील वाहतुकीमधून मार्ग काढताना एक तास लागला. प्रवाशांचे हाल झाले. अशा घटना घडू नयेत म्हणून नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी लक्ष घालावे.
- मसणू रावजी सुतार, प्रवाशी व माजी सभापती, आजरा पंचायत समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com