२७८ शिक्षक होणार मुख्याध्यापक

२७८ शिक्षक होणार मुख्याध्यापक

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

२७८ शिक्षक होणार मुख्याध्यापक

१६ दिव्यांग शिक्षकांची पदोन्‍नती निश्‍चित

कोल्‍हापूर, ता.१९: जिल्‍हा परिषदेच्या २७८ शिक्षकांना पदोन्‍नती देण्याचा निर्णय पदोन्‍नती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्‍नती समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) मनीषा देसाई, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे उपस्‍थित होत्या. यावेळी १६ दिव्यांग शिक्षकांची पदोन्‍नतीही करण्यात आली. या शिक्षकांना पदस्‍थापना मात्र नंतर दिली जाणार आहे.

जिल्‍हा परिषद शाळांसाठी ५११ मुख्याध्यापक पदे मंजूर आहेत. सध्या २३३ मुख्याध्यापकच कार्यरत असून २७८ पदे रिक्‍त आहेत. या रिक्‍त पदांवर शिक्षकांना पदोन्‍नती द्यावी, अशी मागणी संघटनांकडून तसेच पात्र शिक्षकांकडून सातत्याने होत होती. पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्याने अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे पदोन्‍नतीचा निर्णय घेण्याची ग्‍वाही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्‍हाण यांनी दिली होती. त्यानुसार आज पदोन्‍नती समितीची बैठक घेण्यात आली.

पदोन्‍नतीसाठी ४१४ शिक्षक पात्र ठरले आहेत. या सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन त्यानंतर पदोन्‍नती देण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत १६ दिव्यांग शिक्षकांना पदोन्‍नती देण्यात आली. सर्व शिक्षकांना पदोन्‍नती दिल्यानंतर पदस्‍थापना दिली जाणार आहे. पदोन्‍नती होणार असल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
...

८० शिक्षकांना दणका

पदोन्‍नतीसाठी शिक्षकांचे गोपनीय अहवाल महत्‍वाचे आहेत. मात्र काही शिक्षकांचे अहवाल अर्धवट व काहींचे संशयास्‍पद आहेत. त्यामुळे या ८० शिक्षकांचे मूळ गोपनीय अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे अहवाल तपासल्यानंतरच संबंधित शिक्षक पदोन्‍नतीसाठी पात्र की अपात्र, हे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com