Wed, October 4, 2023

महापालिकेस शेणी दान
महापालिकेस शेणी दान
Published on : 19 May 2023, 5:28 am
03855
मनपा स्मशानभूमीस ११ हजार १११ शेणी दान
कोल्हापूर : महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन उल्हास शंकरराव घाटगे यांच्या स्मरणार्थ कुटुंबीयांनी ११ हजार १११ शेणी पंचगंगा स्मशानभूमीसाठी दिल्या. महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांच्याकडे त्या सुपूर्द केल्या. महापालिच्यावतीने मोफत अंत्यविधी करण्यात येतात. त्यासाठी शेणी व लाकूड कमी पडू नये म्हणून स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन केले होते. यावेळी माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, संजय जाधव, बाळासाहेब पसारे, रोहित माने, राजेंद्र चव्हाण, सुनील लाड, छानराव अडूरकर, सुमित कदम, किशोर गुरव, अर्जुन मांडरे, सचिन यादव, गणेश मोरे, राजसिंह घाटगे, शंभुराजे घाटगे, अमरसिंह घाटगे, राजमाता तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.