स्नेहमेळावा

स्नेहमेळावा

०२१३७
पेठवडगाव ः येथील बळवंतराव यादव हायस्कूलच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी माजी विद्यार्थी.

गुरू-शिष्यांचा स्नेह जुळला २६ वर्षांनी
पेठवडगावच्या बळवंतराव यादव हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

पेठवडगाव, ता. १९ : येथील बळवंतराव यादव हायस्कूलच्या दहावीच्या १९९६-९७ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा येथे झाला.
डॉक्टर, इंजिनिअर कन्सल्टंट मार्केटिंग मॅनेजर, प्राध्यापक, राजकीय कार्यकर्ते, व्यावसायिक तसेच गृहिणी अशा अनेक पदांवर कार्यरत असणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सचिन पाटील, रमेश पाटील, दीपक पाटील, डॉ. राहुल चौगुले, डॉ. धनंजय वाघ, रणजित पाटील, अमोल फडणवीस, डॉ. सचिन पाटील, अमोल माळवदे, नितीन माळकर, युनूस मोमीन, महेश लोळगे, सचिन सावर्डेकर, राकेश इंगवले, सविता पाटील, शीला साठे, अंजली तपकिरे, बिस्मिल्ला शिकलगार असे अनेक विद्यार्थी सहभागी होते. निवृत्त शिक्षक एल. के. अवघडे, श्रीमती सालकर, रमेश सूर्यवंशी, जी. आर. पाटील आर्वजून उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक आणि महाविद्यालय यांच्या यशातील योगदानासाठी कृतज्ञता व्यक्त केली. यानिमित्ताने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने विद्यार्थी भावूक झाले. एकमेकांच्या नियमित संपर्कात राहून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाचे संयोजन सुनील पाटील, रणजित पाटील, राहुल खंडागळे यांनी केले. सूत्रसंचालन रवी वासुदेव यांनी केले. स्वागत डॉ. सुप्रिया आवारे यांनी केले. आभार सचिन लाळगे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com