कारवाई होणार -डीएसपी बलकवडे

कारवाई होणार -डीएसपी बलकवडे

अवैध धंद्यांवर वचक बसविणार

पोलिस अधीक्षकः परवाना रद्द करण्याबाबत महापालिकांशी पत्रव्यवहार

कोल्हापूर, ता. १९ः ज्या ठिकाणी अवैध धंदे चालतात, त्यांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याबाबतचा पत्र व्यवहार इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांशी केला आहे. तसेच काही ठिकाणी अतिक्रमण करून मटका जुगारासारखे अवैध धंदे चालतात, त्या ठिकाणचेही अतिक्रमण काढावे, अशीही विनंती केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत अवैध धंद्यांवर कशा पद्धतीने वचक बसविणार यावर बोलताना अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले, की अवैध व्यवसायासाठी कोणीही आपल्या व्यवसायाची जागा भाड्याने देवू नये. यासाठी कारवाई केल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करण्यासाठी जागाच उपलब्ध होणार नाही असा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील चोरीत जप्त केलेला मुद्देमाल मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही मुद्देमाल मिळालेला आहे. तो संबंधिताना परत करण्यासाठी लवकरच मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. काही सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. त्यांच्याकडूनही ती वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे चोरीस गेलेला मुद्देमाल लवकरच संबंधितांना दिला जाणार आहे. परजिल्ह्यातील मुले आजऱ्यातील मदरशात जात असताना ताब्यात घेतली आहेत. ही सर्व प्रक्रीया बाल सुधार समितीकडून होते. त्यांच्याकडून ही प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून जे आदेश होतील, त्या प्रमाणे पोलिस काम करतील.’
----
गोव्यातील सराफावर गुन्हा दाखल होणार

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने गोव्यात विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार गोव्यातील एका सराफावर गुन्हा दाखल होणार आहे. त्याबाबतची कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. कोणीही चोरीचे दागिने किंवा दुचाकी-मोटार खरेदी करू नये, अन्यथा त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा अधीक्षक बलकवडे यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com