
रंकाळा स्वच्छता मोहिम
निवृत्ती तरूण मंडळातर्फे
शिवराज्याभिषेक दिन सोहळा
कोल्हापूर ः येथील निवृत्त तरूण मंडळ, निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे सहा जूनला छत्रपती शिवाजी पेठ शिवराज्याभिषेक सोहळा यंदा साजरा होणार आहे. त्यानिमित्त शुक्रवार (ता.२) पासून विविध स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी (ता.२) सायंकाळी सातला वक्तृर्त्व स्पर्धा, साडेआठला महिलांसाठी कराओके गाण्यांच्या स्पर्धा, शनिवारी (ता.३) धनगरी ढोलवादन स्पर्धा, रविवारी (ता.४) पारंपरिक चर्मवाद्य संबळ स्पर्धा होतील. ढोल व संबळ वादन स्पर्धेसाठी अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार आणि एक हजार अशी बक्षीसे असतील. मंगळवारी (ता.६) सकाळी साडेसातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर अभिषेक होईल. दहा वाजता प्रसाद वाटप आणि रात्री साडेनऊला आतषबाजी होईल, अशी माहिती राजेंद्र जाधव, संजय शेळके यांनी दिली.
-
विविध संस्थांतर्फे उद्या रंकाळा स्वच्छता
कोल्हापूर, ः व्हाईट आर्मी, रंकाळा संवर्धन समितीसह परिसरातील विविध संस्था, संघटना, तरूण मंडळाच्या वतीने रविवारी (ता.२१) रंकाळा स्वच्छता मोहीम होणार आहे. व्हाईट आर्मी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राजवळील पक्षी निरीक्षण केंद्र येथून या मोहिमेला सकाळी साडेसहाला प्रारंभ होणार आहे. रंकाळा वॉकर्स ग्रुप, खणविहार मित्र मंडळ, पतोडी ग्रुप, हिंदू युवा प्रतिष्ठान, माऊली योगा, पतंजली योगा, मॉर्निंग ग्रुप, हास्य ग्रुप, जोतिबा ग्रुप, पतंजली आत्मनिर्भर, संध्यामठ, मैत्रेय प्रतिष्ठान, शाहू स्मृती उद्यान, जाऊळाचा बाल गणेश मंडळ, पक्षीप्रेमी ग्रुप आदींसह तालीम मंडळे भागातील नागरिक या मोहिमेत सहभागी होणार असून, इच्छुकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान, यापूर्वीच्या दोन मोहिमांतून सहा हजारहून अधिक बाटल्या आणि कचऱ्याचे संकलन झाले आहे.
.......