अजित पवार दौरा

अजित पवार दौरा

अजित पवार आज कोल्हापुरात

कोल्हापूर : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी (ता.२०) खासगी कार्यक्रमांसाठी शहरात येणार आहे. एका हॉटेलचे उदघाटन व काही खासगी कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. सायंकाळी पावणेपाच वाजता आर्किटेक्ट ॲंड इंजिनिअर्स असोसिएशनच्या कार्यालयाला ते सदिच्छा भेट देणार आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही नेत्यांच्या त्यांच्याशी भेटी होण्याची शक्यता आहे.
श्री. पवार हे सकाळी ७ः ३० वाजता शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतील. त्यानंतर १० वाजता एका हॉटलचे उद्‌घाटन करतील. दुपारी १२ ला ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्यासोबत चर्चा तर दुपारी १ : ३० ला चेतन नरके यांच्या शिवाजी पेठ येथील निवास्थानी भेट देणार आहेत. २ : ३० वाजता धैर्यप्रसाद हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होईल. ५ वाजता असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स कार्यालयाला भेट देतील. त्यांनतर श्री. पवार बारामतीला रवाना होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com