manoj aambike
manoj aambike sakal

Kolhapur : मुलांच्या यशामध्ये संस्कार महत्त्वाचे; मनोज अंबिके

मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत सहाव्या दिवशी मनोज अंबिके यांनी मार्गदर्शन केले.

इचलकरंजी - ‘‘मुलांच्या यशासाठी संस्कार अधिक महत्त्वाचे असतात. कारण विज्ञान सांगते त्याप्रमाणे सर्व लहान मुलांची मेंदूची क्षमता, ज्ञानेंद्रियांची क्षमता साधारणपणे सारखी असते. पण जशी मुलं मोठी होत जातात तसा मुलांवरील संस्कार आणि साथसंगत यांचा परिणाम अधिक होतो. मुलांना आपण कशा प्रकारचे संस्कार आणि विचार देतो त्यावर त्याचं जीवनातील यश आणि घडणं अवलंबून असतं.’’

असे मत मनोज अंबिके यांनी व्यक्त केले. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत सहाव्या दिवशी ‘कानमंत्र आई-बाबांसाठी व पालकांसाठी’ या विषयाची त्यांनी मार्गदर्शन केले.
येथील मनोरंजन मंडळ, मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब सेंट्रलतर्फे घोरपडे नाट्यगृहात ४५ वी व्याख्यानमाला आयोजित केली आहे. सुरुवातीला श्यामसुंदर मर्दा आणि समीर गोवंडे यांच्या हस्ते पाहुण्यांचे आणि वक्त्यांचे स्वागत करण्यात आले.

manoj aambike
Mumbai : छळ करणाऱ्या पतीस दीड वर्षाचा कारावास

शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सायन्स विभाग प्रमुख प्रा. मनोज कुंभार आणि कस्तुरे चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष डी. एम. कस्तुरे यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. पंडीत ढवळे यांनी प्रास्ताविक केले. संतोष आबाळे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
अंबिके म्हणाले, ‘‘पालकांनी मुलांसाठी वेळ देणे आवश्यक आहे. पण फक्त मुलांसोबत आपण घरी आहोत म्हणजे वेळ दिला असं नाही,

manoj aambike
Pune : ब्रेक फेल झाल्याने बसची सहा वाहनांना धडक; भीषण अपघातात एकजण ठार, तर...

तर त्यांना दर्जात्मक वेळ द्यायला हवा. मुलांनी काय व्हावं याबद्दल आपण विचारपूर्वक आणि गंभीरपणे चर्चा करणे आवश्यक आहे. कोणत्याही मुलांना पालकांनी पटकन हो किंवा नाही म्हणू नये. मुलांना नकार पचवायला शिकवणेही महत्त्वाचे आहे. तुम्ही कसे वागता याचा परिणाम मुलांच्यावर अधिक होत असतो. त्यामुळे मुलांनी जास्त मोबाईल वापरू नये, जास्त टीव्ही पाहू नये, अशा आपल्या अपेक्षा असतील तर आपणही तसेच करायला हवे.’’

manoj aambike
Mumbai : छळ करणाऱ्या पतीस दीड वर्षाचा कारावास

अति अपेक्षाचे ओझे लादू नका
मुलांना आपण योग्य संधी द्यायला हवी, त्याचबरोबर चांगले संस्कार आणि चांगले विचार दिले तर त्या संधीचे सोने ही मुलं निश्चितपणे करतील. मुलांच्यावर अति अपेक्षांचे ओझेही आपण लादता कामा नये. त्यांच्या करिअरबाबत पाठिंबा व सहाय्य करण्याची आपली भूमिका असावी, असे मत अंबिके यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com