माथाडी ढपला भाग ३

माथाडी ढपला भाग ३

लोगो टुडे १ वरून घ्या

रोखीने पैसे घ्या; विषय संपवा
बिगर नोंदणीकृत टोळ्यांच्या म्होरक्यांची वरकमाई; रोज दिड ते तीन लाखांची लुबाडणुक
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. २० : एका ट्रकमध्ये माल भरण्या किंवा उतरण्यासाठी अडीच ते तीन हजार रूपयांची मजूरी होते. बिगर नोंदणीकृत माथाडींच्या टोळ्याकडून माल भरणी उतरणी काही म्होरके करतात. रोखीने पैसे घेत विषय संपवतात. अशा टोळ्यांचा म्होरक्या वरच्यावर पैसे कमवतो. माल उतरणाऱ्या माथाडींना मोजकी रोख मजूरी देतो. अशा बिगर नोंदणीकृत माथाडींकडून होणारे काम शासनाची लेव्ही (कर) बुडवणारे, प्रामाणिक माथाडी कामगारांचे नुकसान करणारे आहे. यातून रोज किमान दिड ते तीन लाखांची लेव्ही बुडवून सुरू असलेला या ‘उद्योगा’चा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून पडदाफाश करण्याची गरज आहे.
माथाडी काम किंवा माथाडी मंडळाचा कारभार सर्वसामान्यांशी थेट निगडीत नाही. त्यामुळे पोलिस, महसुली यंत्रणा अशा यंत्रणांचे फारसे लक्ष असतेच असे नाही. हीच संधी साधून काही ‘फाळकुटदादांनी’ व्यवसायात प्रवेश केला. ‘धाका’च्या बळावर बिगरनोंदणीकृत माथाडींकडून माल उतरण्याचे भरण्याचे परस्पर काम सुरू केले.
इचलकरंजी, गांधीनगर व कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतही ठळक उदाहरणे आहेत. इचलकरंजीत सुताच्या गाठी उचलण्याचे काम मोठ्या प्रमाणात आहे. दिवसाकाठी जवळपास ४०० ते ५०० माथाडी तेथे काम करतात. यातील निम्मेच माथाडी, मंडळाकडे नोंदणीकृत आहेत. उर्वरीत माथाडी नोंदणीकृत नाहीत. एका वस्त्रोद्योग कंपनीत रोज दोनच तीन ट्रक माल उतरला भरला जातो तेथे माथाडीच्या टोळ्याचा म्होरख्या जातो. पाच सहा माथाडींकडून ट्रक उतरला भरला की रोख पैसे घेतो. आपल्याकडील प्रत्येक माथाडीला ५०० रूपये प्रमाणे मजूरी देतो. एका ट्रकसाठी अडीच हजार रूपयांची हमाली घेतली, तर असे म्होरख्या स्वतः एक हजार रूपये घेतो. तीन माथाडींना दिड हजार रूपये देतो. दिवसभरात कमीत कमी दोन ते चार ट्रक माल उतरण्याचे काम केले की तीन-चार हजार रूपयांची कमाई म्होरक्याची होते. असाच प्रकारे गांधीनगर, पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत सर्रास होत आहे.
म्होरक्याकडून बिगर नोंदणीकृत माथाडी कामासाठी वापरले जातात. यात कंपनीला लेव्ही भरावी लागत नाही म्हणून कंपनी वाले ही अशा म्होरक्यांना ट्रक उतरण्या- भरण्याचे काम देतात. बिगर नोदणीकृत माथाडीला अपघात झालेतर उपचार खर्च मिळत नाही, फंड ग्रज्युटीचा लाभ मिळत नाही. काम गेल तर तो दादही कोठे मागू शकत नाही. हे कामागराचे नुकसान होते. लेव्ही रक्कम तीन टक्के आहे. त्या प्रमाणे शासनाला मजूरी बद्दलची लेव्ही मिळत नाही.
---------------
चौकट
सगळेच चिडीचूप
जिल्हाभरात १२०० हून अधिक मालवाहतुकीच्या गाड्यात हजारो टन मालाची चड-उतार होते. यात साडे चार हजारावर बिगर नोंदणीकृत माथाडी काम करतात त्या सर्वांची मजूरीवरील लेव्हीची रक्कम दिड ते तीन लाखांपर्यंत जाते. लेव्ही भरली जात नसल्याने माथाडीनेही कोणताही लाभ नाही. एवढे होऊनही सगळेच चिडीचूप आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com