लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणूक

महाविकासला ''मेरीट''च्या उमेदवाराचा शोध

चाचपणीत मात्र सध्या निराशाच; काँग्रेस निर्णायक भूमिकेत येण्याची शक्यता

कोल्‍हापूर, ता.२०: भाजपने २०२४ मध्ये कोल्‍हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ‘कमळ’ फुलवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे तर दोन्‍ही मतदारसंघात ठाण मांडून आहेत. दुसरीकडे जिल्‍ह्यातील ठाकरे गटाचे दोन्‍ही खासदार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. भाजप, शिंदे आघाडीत आपणालाच पुन्‍हा उमेदवारी मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. तर विरोधी महाविकास आघाडीकडून तगड्या उमेदवाराचा शोध सुरु आहे. यासाठी काही नावांची ''जाणीव''पूर्वक पेरणी सुरु आहे. असे असले तरी, ऐनवेळी मात्र धक्‍कातंत्राचा वापर करुन ''वलय'' असणाऱ्या‍ उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

वर्षभराने येणाऱ्या‍ लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या सर्वात आजघडीला भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपकडून ‘कमळ’ चिन्‍हावरच खासदार होईल, असे वारंवार सांगितले जात आहे. कोल्‍हापूरचे दोन्‍ही खासदार हे शिंदे गटाचे आहेत, हे माहित असतानाही त्यांनी दोन्‍ही मतदारसंघात ‘कमळ’ फुलवण्याचा निर्धार केला आहे, हे विशेष. या सर्व पार्श्‍वभूमीवर शिंदे गटाने किंवा कोल्‍हापूरचे खासदार प्रा.संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनीही कधी भाष्य केलेले नाही. कदाचित नैसर्गिक न्यायामुळे लोकसभेची उमेदवारी निश्‍चित असावी, या विश्‍‍वासापोटी त्यांनी यावर भाष्य केले नसल्याची मोठी शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट आपापल्या परीने प्रयत्‍न करत असताना महाविकास मात्र तगड्या व सर्वसमावेशक उमेदवाराच्या शोधात आहे. सध्या मतदारसंघ राष्‍ट्रवादीकडे असल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे. लोकसभा लढण्याएवढा, मंडलिकांच्या बालेकिल्‍ल्याला खिंडार पाडणारा, भाजपच्या सर्व खेळींना पुरुन उरणारा उमेदवार शोधताना आघाडीच्या नेत्यांची कसोटी लागली आहे. आघाडीकडून काही इच्‍छुकांची नावे घेतली जात असली तरी ''हुकमी'' नावांबाबत गुप्‍तता पाळली जात आहे. लोकसभेपूर्वी स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थांच्या निवडणुका होण्याची शक्यता गृहित धरुन, त्यानंतर उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब करण्याची चर्चाही महाविकास आघाडीत सुरु आहे.
...

काँग्रेसवरच विरोधकांचे अधिक लक्ष

लोकसभेची कोल्‍हापूरची जागा राष्‍ट्रवादीकडे असली तरी हातकणंगले मतदारसंघासारखी आदलाबदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे कोल्‍हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची भूमिका निर्णायक असणार आहे. मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची ताकद निश्‍चितच दखल घेण्याएवढी आहे. त्यामुळे राष्‍ट्रवादीला तगडा उमेदवार मिळाला नाहीतर काँग्रेस यामध्ये महत्‍वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळेच राष्‍ट्रवादीपेक्षा विरोधकांचे या मतदारसंघात काँग्रेसवरच अधिक लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com