टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच

टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच

टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये
महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच
कोल्हापूर, ता. २० : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा टेनिस असोसिएशन (केडीएलटीए) यांच्यातर्फे व डी. वाय. पाटील ग्रुप पुरस्कृत १८ व्या रमेश देसाई मेमोरियल १६ वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुले व मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले.  प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पुढील फेरीत प्रवेश केला.
केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, कोल्हापूर येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या चौदाव्या मानांकीत अहान शेट्टी याने आपला राज्य सहकारी नीरज जोर्वेकरचा ९-१ असा, तर तेलंगणाच्या बिगर मानांकित अंजन बुरेला याने महाराष्ट्राच्या पंधराव्या मानांकीत अरमान मुलचंदानी याचा ९-२ असा एकतर्फी लढतीत पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. महाराष्ट्राच्या ओमेश औटी याने त्रिशिक वाकलकर याचा ९-४ असा, तर सक्षम भन्साळीने देवराज मंदाडेचा ९-७ असा पराभव करत दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. आरोही देशमुखने भक्ती मैदारकरचा ९-४ असा. श्रीमोयी कामतने संयुक्ता पगारेचा ९-३ असा पराभव केला. महाराष्ट्राच्या आकांक्षा अग्निहोत्रीने कर्नाटकच्या एलिन हर्षिनी जॉन्सन हीचा ९-५ असा, तर महाराष्ट्राच्या रितिका दवलकरने आपली राज्य सहकारी मायरा टोप्नोचा ९-२ असा सहज पराभव करत दुस-या पात्रता फेरीत प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com