
पाटाकडील ब चा विजय
लोगो - अटल चषक फुटबॉल स्पर्धा
04019
कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी खंडोबा तालीम विरुध्द पाटाकडील तालीम सामन्यातील एक क्षण.
पाटाकडील ‘ब’ चा विजय
‘खंडोबा तालीम’ला नमविले; अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू
कोल्हापूर, ता. २० : ताटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेला छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात झाली. उद्घाटनाच्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ संघाने खंडोबा तालीम मंडळ संघाला एक विरुद्ध ० गोलने नमवत विजयी सुरुवात केली. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत, रुपाराणी निकम, माधुरी नकाते, किशोरी स्वामी व अन्य उपस्थित होते.
पीटीएम ब संघाच्या गोलरक्षकाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे खंडोबा संघाचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत. आक्रमक चाली रचणाऱ्या खंडोबा संघाने पीटीएम ब संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. पीटीएम ब संघाकडून देखील प्रयत्न फसले. मात्र सामान्यांच्या २० व्या मिनिटाला महोम्मद अत्तार यान इंगोले नोंदवत पीटीएम ब संघाला आघाडी मिळवून दिली. थोड्याच वेळात हाताने चेंडू हाताळल्यामुळे खंडोबा संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. मात्र प्रभू पोवार ने मारलेला फटका पीटीएम ‘ब’चा गोल रक्षक विशाल नारायणपुरे याने अडवला. पूर्वार्ध १ - ० असाच राहिला. उत्तरार्धात खंडोबा संघाने अधिक आक्रमक चाली रचल्या. यात दिग्विजय असणेकर, कुणाल दळवी, संकेत मेढे, श्रीधर परब, दर्शन पाटील यांनी केलेले प्रयत्न गोलमध्ये रूपांतरित होऊ शकले नाहीत. मिळालेल्या संधीवर मारलेले बेजबादार फटके गोलजाळीवरून गेले. या नंतर दोन्ही संघाना गोल नोंदवता आले नसल्याने सामना १ - ० असा राहिला.
----------------
सामनावीर
विशाल नारायणपूरे - पीटीएम ‘ब’
-------------
लढवय्या
संकेत मेढे - खंडोबा तालीम मंडळ
--------------
आजचा सामना
पीटीएम ‘अ’ विरुद्ध संध्यामठ तालीम मंडळ