पुरोहीत संघातर्फे नदी घाट स्वच्छता

पुरोहीत संघातर्फे नदी घाट स्वच्छता

03973
कोल्हापूर : जिल्हा ब्राह्मण पुरोहीत संघातर्फे शनिवारी पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली. (नितीन जाधवः सकाळ छायाचित्रसेवा)

पुरोहीत संघातर्फे
नदी घाट स्वच्छता
१२ डंपर कचरा संकलीत; नदीची केली आरती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : जिल्हा ब्राह्मण पुरोहीत संघ याच्यातर्फे आज पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ६० पुरोहीतांनी सहभाग घेतला होता. या सर्वांनी सुमारे १२ डंपर कचरा संकलीत केला. त्यानंतर नदीची आरती करून आपली कृतज्ञता व्यक्त केली.
पौरोहित्य करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन जिल्हा ब्राह्मण पुरोहीत संघाची स्थापना केली आहे. या संस्थेतर्फे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. महापुरा सारख्या नैसर्गित आपत्तीमध्येही पुरोहीत संघाने पुरग्रस्तांना विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या होत्या. संस्थेतर्फे गेली सहा वर्षे सातत्याने नदी घाटाची स्वच्छता केली जाते. यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला. सायंकाळी ४ ते ७ या कालावधीत पुरोहीत संघाच्या सदस्यांनी संपूर्ण नदी घाटाची स्वच्छता केली. येथील निर्माल्य, पालापाचोळा, प्लॅस्टीक पिशव्या, बाटल्या त्यांनी संकलीत केल्या. सुमारे १२ डंपर कचरा त्यांनी जमा केला. हा कचरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नेला. त्यानंतर नदीची आरती करण्यात आली. या वेळी राजाभाऊ कुंभार यांची प्रमूख उपस्थिती होती. या उपक्रमात अध्यक्ष प्रसाद निगुडकर, स्वप्निल मुळे, ओंकार कारदगेकर, निलेश कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, संदीप काजरेकर, सचिन पितांबरे यांच्यासह पुरोहीत संघाचे सदस्य सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com