बांधकाम कामगार प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगार प्रस्ताव
बांधकाम कामगार प्रस्ताव

बांधकाम कामगार प्रस्ताव

sakal_logo
By

04024
कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्या बैठकीत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर, कामगार आयुक्त विशाल घोडके आदी.

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे
प्रस्ताव मार्गी लावा : आबिटकर
कामगार आयुक्तांसह कामगार संघटनांची बैठक
कोल्हापूर, ता. २० : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मंडळाकउून विविध योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मात्र कामगारांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवलेल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसून बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणेसाठी त्यांचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मार्गी लावा, अशा सुचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी बांधकाम आयुक्तांना केल्या. ते बांधकाम आयुक्त व कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आयोजित बैठकीत बोलत होते.
कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजना शेवटच्या कामगारांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कमी पडणार नसल्याचे सांगितले. तसेच आपल्या कार्यालयात सादर करण्यात आलेले प्रस्ताव तत्काळ मार्गी लावून शासनाच्या सर्व योजना कामगारांना देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी सांगितले.
सरकारी कामगार अधिकारी वाय.एम.हुबे, नोंदणी अधिकारी जी. एस. थोरवत, रविकिरण अंबी, अजित चव्हाण, इंद्रजित पाटील, उमेश चौगले, संयुक्त कामगार संघटनेचे के. पी. पाटील आदी उपस्थित होते.