इचल: मारामारी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: मारामारी गुन्हा
इचल: मारामारी गुन्हा

इचल: मारामारी गुन्हा

sakal_logo
By

इचलकरंजी मारामारीप्रकरणी
१६ जणांवर गुन्हा दाखल

दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी

इचलकरंजी, ता.२० ः येथील लालनगरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या दोन गटातील मारामारीप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात परस्परविरोधी १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अविनाश विजय चव्हाण (वय २६, रा.लालनगर) आणि आकाश तानाजी आवळे (वय २०, रा. आवळे गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेत चाकू, कोयता यांचा वापर करण्यात आला होता.
अविनाश चव्हाण याने दिलेल्या तक्रारीनुसार, फिलीप आवळे, मयुर आवळे, सौरभ आवळे, आकाश आवळे, विकी साठे, अरबाज पठाण यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन डोक्यात, मानेवर, उजव्या पायावर, डाव्या हाताच्या बोटावर कोयत्याने वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आकाश आवळे याने दिलेल्या तक्रारीनुसार अविनाश चव्हाण, अजित आवळे, अभी जगताप, आण्णा आवळे, देवदान आवळे, रोहित भोसले यांच्यासह तीन ते चार अनोळखी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. पैसे न दिल्याच्या कारणातून चव्हाण याने चाकूने आकाश याच्या डाव्या बाजूच्या बरगडी व डाव्या कानाजवळ वार केला. तर अन्य संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर लालनगर, आवळे गल्ली परिसरात तणाव निर्माण झाला होता.