कुंभार सोसायटी निवडणक

कुंभार सोसायटी निवडणक

04026
कोल्हापूर : कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटी लिमिटेड संस्थेच्या निवडणूकीत संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार सत्तारुढ युवाशक्ती पॅनेल विजयी झाल्यावर महिलांनी जल्लोष साजरा केला.

कुंभार माल उत्पादक संस्‍थेत
सत्तारूढचे सर्व उमेदवार विजयी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी संस्‍थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार युवा शक्ती सत्तारूढ आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले. श्री संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार परिवर्तनचे सर्वउमेदवार पराभूत झाले.
या सोसायटीचे सभासद शाहपुरी कुंभार गल्ली, धोत्रीगल्ली, ऋण मुक्तेश्वर, पापाची तिकटी, बजापराव माजगावकर तालिम परिसर आदी भागात आहेत. यातून सत्तारूढ व विरोधी गटाचे परिवर्तन पॅनल अशा दोन पॅनल मध्ये निवडणूक झाली.
यात सत्तारूढ गटाचे अभिजित शिवाजी कुंभार, चंद्रकांत बापूसो कुंभार, महेंदर तुकाराम कुंभार, शिवाजी शशिकांत कुंभार, आशिष राजेंद्र पाडळकर, एकनाथ मारूती माजगावकर, शांताराम सिताराम माजगावकर, राकेश प्रकाश वडणगेकर, महिला प्रतिनिधी - उज्वला भरत ब्रम्हपुरे, सुरेखा सुरेश माजगावकर इतर मागास प्रतिनिधीमध्ये विजय वसंतराव पुरेकर हे उमेदवार विजयी झाले. निवडणूकीत एक हजार ३४९ इतके एकूण मतदान झाले. यापैकी एक हजार २५५ मत वैद्य ठरली. विजय तोडकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com