
इचल: गुटखा जप्त
गुटखा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक
इचलकरंजी ः प्रतिबंधित गुटखा-सुगंधी तंबाखू विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. अजय गोडचप्पा वज्रमुठी (वय २७, रा. शेळके मळा), मनोज शंकर वदडी (२७, कृष्णानगर) आणि इम्रान अब्दुलसत्तार पटवेगार (४०, खंडोबावाडी, यड्राव) अशी त्यांची नावे आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुटखा, सुगंधी तंबाखू आणि ३ दुचाकी वाहने, ३ मोबाईल असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांना २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली मिळाली आहे. पोलीस अधिक्षकांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कर्नाटकातून इचलकरंजीत गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यामुळे शनिवारी पोलिसांनी पंचगंगा नदी पुलावर सापळा रचून गुटखा वाहतुक करणाऱ्या ३ दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३ लाख ४ हजारांचा गुटखा, सुगंधी तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरलेली वाहने, मोबाईल असे साहित्य जप्त केले.