शिवाजी विद्यापीठ पुस्तक प्रकाशन

शिवाजी विद्यापीठ पुस्तक प्रकाशन

04040
...

सिनेसाक्षरता वाढविण्याची आवश्यकता

प्रा. डॉ.माया पंडीत ः ‘अंडर द लेन्स: फिल्म्स..’चे प्रकाशन

कोल्हापूर, ता. २० ः ‘चित्रपटांचा कलेच्या पलिकडे जाऊन विविधांगांनी संशोधकीय अभ्यास होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सिनेसाक्षरता वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन प्रा. माया पंडित यांनी केले. त्या ‘अंडर द लेन्स: फिल्म्स, जेंडर अँड कल्चर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे शुक्रवारी ‘अंडर द लेन्स: फिल्म्स, जेंडर अँड कल्चर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. हे पुस्तक इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी आणि डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी संयुक्तरित्या संकलित व संपादित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.
प्रा. माया पंडित म्हणाल्या, ‘कोल्हापूरने भारतीय सिनेमाच्या जडणघडणीत दिलेले योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. याचे विसमरण होऊ देता कामा नये. कोल्हापुरात ‘सिनेमा आणि संस्कृती व लिंगभावना’ या अतिशय महत्त्वाच्या विषयावर परिषद होते आणि त्यातील चर्चेचे पुस्तकरुपाने प्रकाशन होते आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो.’चित्रपटांकडे पाहण्याचा निकोप दृष्टीकोन विकसित होण्यासाठी शिक्षणामध्ये सिनेमाला स्थान देण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.’
चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडीया यांनी चित्रपटांचा समाजव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी विवेचन केले. समर नखाते यांचा पुस्तकातील लेख सिनेमाचे बदलते स्वरूप आणि सामाजिक वास्तव समजावून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड तसेच इटालियन सिनेमाच्या विवेचनामुळे हे पुस्तक बहुसांस्कृतिक झाले आहे.’ या सर्वच सांस्कृतिक परिस्थितीमध्ये स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र फारसा वेगळा नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. करेकट्टी यांनी पुस्तकाचा आशय व प्रकाशनामागील उद्देश स्पष्ट केला.

मेघा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. डी. एन. पाटील, डॉ. अरुंधती पवार, डॉ. श्रुती जोशी यांच्यासह इंग्रजी विभागातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com