५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५

sakal_logo
By

कोल्हापूर : बारा बलुतेदार राजस्थानी समाजाच्या वतीने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा सत्कार झाला.
....

बाबा रामदेव मंदिर
जीर्णोध्दार उत्सवाला प्रारंभ


कोल्हापूर : येथील कोल्हापूर- सांगली मार्गावरील बाबा रामदेव यांच्या मंदिर जीर्णोध्दार उत्सवाला आजपासून भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. देशभरात असंख्य मंदिरे आणि भक्तगण लाभलेल्या बाबा रामदेव महाराज यांचे शिरोलीनजीक पुरातन मंदिर आहे. बारा बलुतेदार राजस्थानी समाजाचे आदरस्थान असलेले श्री रामदेव बाबा यांच्या मंदिराच्या प्रांगणात शास्त्री विक्रम प्रसाद यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात होमहवन करण्यात आले. दिवसभर भाविकांनी होमहवन आणि रामदेवजीबाबा यांचे दर्शन घेतले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी देखील मंदिराला भेट दिली. त्यांचे राजस्थानी पगडी बांधून समाज बांधवांनी स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी बारा बलुतेदार राजस्थानी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगरसेवक ईश्‍वर परमार, संयोजक मोहब्बतसिंग देवल, गुमानसिंग देवडा, शांतीलाल पुरोहित, हिरालाल पुरोहित यांच्यासह भाविक उपस्थित होते.