
जरगनगर शाळा पालक निवेदन
04213
कोल्हापूर : शाळा दुपारच्या सत्रात भरवण्यासाठी पालक विद्यार्थ्यांसह जरगनगर विद्यालयात जमून प्राथमिक शिक्षण समितीला निवेदन दिले.
जरगनगर शाळा पालकांचे निवेदन
कोल्हापूर : दुसरीच्या इयत्तेची शाळा दुपारच्या सत्रात भरवण्यासाठी श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यालयातील पालकांनी विद्यार्थ्यांसह आज थेट प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकाऱ्यांना गाठले. लहान मुले असल्याने वेळ बदलावी, अशी मागणी केली. त्याबाबत प्रशासनाधिकाऱ्यांनी जागेची अडचण मांडत शाळेत पालकांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. गेल्यावर्षी पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पुढील वर्षीपासून दुसरीचे वर्ग दुपारच्या सत्रात भरवले जातील, असे मुख्याध्यापकांनी सांगितले होते. त्यानुसार यंदा अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा होती. पण पहिली, दुसरीचे वर्ग सकाळच्या सत्रात भरतील, असे शाळेने सांगितले. त्यामुळे पालक वैतागले व आज शाळेसमोर सर्वजण जमले. त्यांनी मुख्याध्यापकांशी चर्चा केली. पालक संतापले, तक्रारी मांडल्या. त्यानंतर मुख्याध्यापकांनी प्रशासनाधिकाऱ्यांकडे मागणी करा, असे सुचवले. त्यानुसार सर्व पालकांनी विद्यार्थ्यांसह छत्रपती शिवाजी मार्केटमधील प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांची भेट घेतली. त्यावेळी निवेदन दिले. या वेळी स्नेहल कुंभोजकर, नीलम पाटील, अवधूत भोसले, मीनल पाटील, किशोर हराळे, युवराज भांदिगरे, प्रतिभा पुरेकर आदी पालक उपस्थित होते.