खरीप पेरणी मशागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप पेरणी मशागत
खरीप पेरणी मशागत

खरीप पेरणी मशागत

sakal_logo
By

मशागतीची कामे जोमाने सुरु

बेभरवशाच्या पावसामुळे पेरण्यांना मात्र अवधी


कोल्हापूर, ता. २२ : राज्यात आणि जिल्ह्यात १० ते १५ जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मॉन्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे, जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्यांसाठी मशागतीची कामे जोमाने सुरु आहेत. दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून ‘रोहिणीचा पेरा, त्याला मोत्याचा तुरा’ अशी शेतकऱ्यांमध्ये असणारी धारणा आणि याच धारणेनुसार होणारी पेरणी मात्र बेभरवशाच्या पावसामुळे मंदावली आहे.
जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्यांसाठी मशागतीची कामे सुरु झाली आहेत. यावर्षी वळीव पावसाने म्हणावी तशी साथ दिलेली नाही. त्यामुळे रोहिणीचा पेरा चुकवावा लागत आहे. वास्तविक रोहिणी नक्षत्रामध्ये भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर धान्य आणि कडधान्य पेरणीला गती आलेली असते. गेल्या महिन्याभरात ज्या-ज्या ठिकाणी पाऊस झाला आहे. त्या ठिकाणीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. राधानगरी, शिरोळ, हातकणंगले, आजरा, चंदगड तालुक्यातील ७० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र पेरणीसाठी सज्ज झाले आहे. रोहिणी नक्षत्र मात्र कोरडेच जाणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसात जिल्ह्यात मॉन्सून पूर्वपाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
पावसाच्या भरवशावरच पेरण्या केल्या जाणार आहेत. गेल्या दोन वर्षात १० ते १५ तारखेदरम्यान २० ते २५ टक्के पेरण्या झाल्या होत्या. आता मात्र तशी परिस्थिती दिसून येत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक पेरण्या भात, सोयाबीन आणि भुईमूगाच्या होत आहेत. तब्बल ७० हजार हेक्टर भात आणि त्याच पटीत सोयाबीनची पेरणी होते. एखादा पाऊस झाल्यानंतर भात व सोयाबीनची टोकण सुरु होणार आहे. रोहिणी नक्षत्रातच बहुतांश शेतकरी भातासह हळदीची लागण करतात. मृग नक्षत्रानंतर मॉन्सूनची सुरुवात होते. तोपर्यंत सर्व पेरण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.
...

अपेक्षित खतांचा पुरवठा व्हावा

हंगामात शेतकऱ्यांना खताची मात्रा पुरेशी मिळेल का? याबद्दल शंका आहे. तसेच, लिंकिंगवर खते घेण्याचा सपाटा लावला असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक आणि अपेक्षित खतांचा पुरवठा केला जावा, अशी मागणी होत आहे.