
घाळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शुभेच्छा
gad226.jpg
04223
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात सुषमा खोत यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रा. भरत सोलापुरे, डॉ. मंगलकुमार पाटील, डॉ. सतीश घाळी उपस्थित होते.
-----------------------------
घाळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शुभेच्छा
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीएच्या तिसऱ्या वर्षाच्या तसेच एमए, एमकॉम, एमएस्सीच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थी प्रा. भरत सोलापुरे, पोलिस उपनिरीक्षक सुषमा खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अनिल उंदरे यांनी स्वागत केले. डॉ. नागनाथ मासाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. सोलापुरे यांनी भविष्यातील विविध संधीबाबत मार्गदर्शन केले. सुषमा खोत यांनी अनुभव कथन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांचीही भाषणे झाली. सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक किशोर हंजी उपस्थित होते. डॉ. सरोज बिडकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मनोहर पुजारी यांनी आभार मानले.