आजरा ः पेद्रेवाडी सरपंचावरील ठऱाव फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः पेद्रेवाडी सरपंचावरील ठऱाव फेटाळला
आजरा ः पेद्रेवाडी सरपंचावरील ठऱाव फेटाळला

आजरा ः पेद्रेवाडी सरपंचावरील ठऱाव फेटाळला

sakal_logo
By

पेद्रेवाडी सरपंचावरील
अविश्वास ठराव फेटाळला

भादवणः पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील सरपंच लता रेडेकर यांच्यावर पाच सदस्यांनी दाखल केलेला ठराव फेटाळण्यात आला. तहसीलदार समीर माने विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सरपंच रेडेकर या विकासकामांची पूर्तता न करणे, मनमानी कारभार करणे अशी कारणे देत धनाजी डोंगरे, अशोक लोहार, स्मिता चव्हाण, राजश्री डोंगरे, प्रकाश ढवळे यांनी पाच दिवसांपूर्वी अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठराव सभेकडे तालुक्याचे लक्ष लागून राहीले होते. सोमवारी सकाळी अकरा वाजता आवाजी मतदान घेण्यात आले. अविश्वास ठरावाच्या बाजूने पाच तर विरोधात दोन अशी मते पडली. तीन चतुर्थांश बहुमत न झाल्याने ठराव बारगळला. यावेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, मंडल अधिकारी प्रकाश जोशीलकर, ग्रामसेवक राहुल सुतार आदी उपस्थित होते.