
बुथ पातळीवर कार्यकर्त्यांची फळी मजबूत करा
ich224.jpg
04290
इचलकरंजी ः शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीत संपर्क प्रमुख योगेश जानकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाप्रमुख रवींद्र माने उपस्थित होते.
-----------
बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची फळी मजबूत करा
योगेश जानकर; इचलकरंजी येथे शिवसेना पदधिकारी आढावा बैठक
इचलकरंजी, ता. २२ ः बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यावर पदाधिकाऱ्यांनी भर द्यावा. या कामात गती येण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपल्या नियंत्रणाखालील उर्वरित निवडी कराव्यात, अशी सूचना शिवसेना (शिंदे गट) संपर्क प्रमुख योगेश जानकर यांनी केली.
येथील मातोश्री भवनात पार पडलेल्या शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी रवींद्र माने होते. हातकणंगले लोकसभा व विधान सभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवीन पदाधिकारी निवडी जाहीर झाल्या. नूतन पदाधिकाऱ्यांना जानकर यांच्या हस्ते निवडीची पत्रे प्रदान केली. उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, अविनाश बनगे, शिवकुमार स्वामी, शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे, कोरोचीचे सरपंच संतोष भोरे, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख रहिम जमादार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, शहरप्रमुख रूपाली चव्हाण, युवा सेना जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील, राकेश खोंद्रे, पन्हाळा तालुकाप्रमुख अशोक पाटील, शिरोळ तालुकाप्रमुख उदय झुटाळ आदी उपस्थित होते.