केंद्रीय मंत्र्यांकडून गोकुळचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय मंत्र्यांकडून गोकुळचा सत्कार
केंद्रीय मंत्र्यांकडून गोकुळचा सत्कार

केंद्रीय मंत्र्यांकडून गोकुळचा सत्कार

sakal_logo
By

04359
...

बायोगॅसमध्ये ‘गोकुळ’ चे कार्य कौतुकास्पद

केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपालाः ‘गोबर से समृध्‍दी’ कार्यक्रमाचा पुण्यात प्रारंभ

कोल्हापूर :ता.२२. बायोगॅस प्रकल्पामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध (गोकुळ) उत्पादक संघाचे कार्य कौतुकास्पद आणि आदर्शवत असल्याचे मत केंद्रीय पशुसंवर्धन, मत्य पालन व दुग्ध व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज व्यक्त केले.
एन.डी.डी.बी, कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध (गोकुळ) उत्‍दपादक संघ, पुणे जिल्‍हा सहकरी दूध उत्‍पादक संघ, भंडारा जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ यांच्‍या वतीने आयोजित ‘गोबर से समृध्‍दी’ या कार्यक्रमाच्या पहिल्‍या टप्प्याचा प्रारंभ पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात श्री. रुपाला यांच्या हस्ते झाला.
रुपाला म्हणाले, ‘दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख स्तंभ बनला आहे. बायोगॅस प्रकल्प दुग्ध व्यवसायातील अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख घटक आहे. एन.डी.डी.बी, सिस्टीमा प्लस, मृदा या कंपनीने बायोगॅस मॉडेल उत्तम दर्जाचे बनवले आहे. शेतकरी हवा, पाणी आणि निसर्ग यांच्याशी संघर्ष करीत असतो. पण आपल्या शेती व्यवसायामध्ये नवनवीन प्रयोग करण्यास तो इच्छुक नसतो. या बायोगॅस योजनेमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवला पाहिजे. बायोगॅसचा उपयोग पर्यावरणातील समतोल राखण्यास होत असून आपणही त्याचा एक घटक होऊ शकतो. महाराष्ट्रातील गोकुळ, पुणे दूध संघ यांच्यावतीने या योजेनेची सुरवात झाली आहे. हि योजना लवकरच देशभरात पोहवली जाईल. ’
‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, ‘गोबर से समृद्धी’ या योजनेंतर्गत एन.डी.डी.बीकडून गोकुळला ५००० बायोगॅस बसवण्यासाठी मंजुरी दिली होती. मात्र गोकुळकडे तब्बल ९००० दूध उत्पादकांनी नोंदणी केली आहे. यापैकी १५०० बायोगॅस आजअखेर बसले आहेत. उर्वरित बायोगॅस डिसेंबर २०२३ अखेर कार्यान्वित केले जातील. बायोगॅस योजनेमुळे दूध उत्पादक महिलांचे शेण वाहून नेणे, शेणी लावणे, वाळवणे, त्याची साठवणूक करणे ही कष्टाची कामे कमी झाली आहेत. महिलांना घरच्याघरी स्वयंपाकसाठी गॅस उपलब्ध झाला आहे. गॅस सिलेंडर विकत घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत.’ यावेळी एन.डी.डी.बी.चे अध्यक्ष मिनेष शाह, पुणे जिल्‍हा सहकरी दूध संघाच्या चेअरमन श्रीमती केशरताई पवार, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे,अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, संभाजी पाटील,बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.
.....
`गोकुळ’मुळे समृध्दी

बाचणी (ता. कागल) येथील गीतांजली पाटील आणि भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील नंदा जोगोजे या गोकुळच्या सभासद महिलांनी कार्यक्रमात गोकुळने दिलेला बायोगॅस निश्‍चिपणे लाभदायक आहे. दुग्ध व्यवसायासोबत शेतीला सेंद्रीय खत मिळू लागले आहे. शेणापासून मुबलक गॅस मिळत असल्याने गॅससाठी महिन्याला हजारो रुपये मोजावे लागत नसल्याने मत व्यक्त केले.
...