प्रॅक्टिस क्लब चा झुंजार क्लब वर विजय

प्रॅक्टिस क्लब चा झुंजार क्लब वर विजय

04329

‘प्रॅक्टिस’ची झुंजार क्लबवर मात 
पेनल्टीवर केला एकमेव गोल; पुढील फेरीत दाखल

कोल्हापूर, ता. २२ : प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने झुंजार क्लब संघावर १ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील सामना छत्रपती शाहू स्टेडियमवर झाला. तत्पूर्वी सामन्याचे उद्‌घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. 
रटाळवाण्या झालेल्या सामन्यात मिळालेल्या पेनल्टीवर झालेल्या गोलमुळे प्रॅक्टिस संघाने झुंजार क्लबवर विजय मिळवला. सामन्याच्या सुरवातीपासून दोन्ही संघांनी एकमेकांना आजमावण्यास सुरवात केली. मैदानभर चेंडू फिरवणे एवढेच चालले होते. गोलसाठी होणारे प्रयत्न अपुरे होते, तर मध्य फळी व बचाव फळी अंग राखून खेळताना दिसली. पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धातही पूर्वार्धातील चित्र दिसले. ‘झुंजार’च्या प्रथमेश बाटे याने ‘प्रॅक्टिस’च्या सागर चिले याला धोकादायक अडवल्यामुळे पेनल्टी बहाल करण्यात आली. ५१ व्या मिनिटाला या मिळालेल्या संधीवर आदित्य पाटील याने गोल नोंदवत ‘प्रॅक्टिस’ला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहत सामना प्रॅक्टिस संघाने जिंकला.

चौकट
उत्कृष्ट असे
लढवय्या ः अवधूत पाटोळे (झुंजार क्लब) 
सामनावीर ः सागर पोवार (प्रॅक्टिस क्लब) 

चौकट
आजचा सामना 
सायंकाळी ४ ः फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध बीजीएम स्पोर्टस्

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com