मदरसा, मशिद तपासणी करा ः हिंदुत्त्ववादी संघटनांची मागणी.

मदरसा, मशिद तपासणी करा ः हिंदुत्त्ववादी संघटनांची मागणी.

04360
...

जिल्ह्यातील मदरसा, मशिदींची
तपासणी कराः हिंदुत्ववादी संघटना

कोल्हापूर ः आजरा येथील मदरशामध्ये नेण्यात येणाऱ्या ६९ मुलांप्रकरणी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील मदरसे आणि मशिदी यांच्यामध्ये कोण व्यक्ती राहतात. त्यांची माहिती पोलिस दलाला असते का? यासाठी जिल्ह्यातील सर्व मदरसे आणि मशिदी यांची चौकशी करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. याचे निवेदन सोमवारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, आजरा येथील मदरशात नेण्यासाठी ६९ मुलांना ट्रकमधून आणण्यात आले होते. ही मुले कुठली आहेत, त्यांना येथे का आणले होते? याची सखोल चौकशी केली पाहिजे. तसेच जिल्ह्यातील मदरसे आणि मशिदींमध्ये व्यक्ती वास्तव्याला असतात. त्या कोण असतात? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मदरसे आणि मशिदी यांची सखोल चौकशी केली गेली पाहिजे. यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या संस्थांची चौकशी करणे आवश्यक आहे. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात आशिष लोखंडे, पराग फडणीस, शिवानंद स्वामी, दीपक देसाई, अनिरुद्ध कोल्हापुरे, अशोक देसाई, महेश उरसाल, अवधूत भाट्ये यांच्यासह हिंदुत्‍ववादी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com