बाजार समिती बैठक

बाजार समिती बैठक

लोगो
...

पाच-पाच जणांना मिळणार संधी

बाजार समिती सभापती निवड गुरुवारीः जिल्हा बँकेत बैठक


कोल्हापूर, ता. २२ : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड गुरुवारी (ता. २५) होणार आहे. यामध्ये जनसुराज्यच्यावतीने प्रकाश देसाई, राष्ट्रवादीकडून सुर्यकांत पाटील आणि काँग्रेसकडून भैय्या पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीला तीन वर्ष तर काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाला प्रत्येकी एक- एक वर्ष सभापती पद दिले जाणार आहे. यामध्ये, सर्वच पदाधिकाऱ्यांनी काटकसरीने आणि शेतकऱ्यांचा हिताचा कारभार करावा, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे आणि खासदार संजय मंडलिक यांनी आज दिल्या. दरम्यान, गुरुवारीच सर्व नेते चर्चा करुन सभापती आणि उपसभापतींचे नाव निश्‍चित करतील. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील पाकिटबंद नाव घेवून बाजार समितीत जावून सभापती आणि उपसभापतींचे नाव घोषित करतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ही बैठक झाली.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जनसुराज्यमध्ये मोठी चुरस आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा बँकेत बैठक़ झाली. यामध्ये बाजार समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हिताचा कारभार करावा. बाजार समिती नावारुपाला आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. सभापती- उपसभापती म्हणून पाच-पाच जणांना संधी मिळणार आहे. ही संधी मिळाल्यानंतर सर्वांना सोबत घेवूनच काम केले पाहिजे, असेही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार के.पी.पाटील, ए.वाय.पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com