
प्रहार संघटना बैठक
04379
...
प्रहार जनशक्ती पक्षाच्या आढावा
बैठकीत पक्षविस्ताराची चर्चा
कोल्हापूर ः प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीत स्थानिक पक्षविस्तार, नवीन पदनियुक्ती व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रहारसेवक, रुग्णसेवक, पदाधिकारी व वरिष्ठ शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी वरिष्ठांकडून काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. उल्लेखनीय कार्याबद्दल रुपाली जाधव, अनिस मुजावर, शितल कुरले, स्नेहल कारेकर, विकास गायकवाड, दगडु माने, लता डवरी, अमर शेणेकर आदींचा सत्कार करण्यात आला. डॉ.प्रियदर्शनी चोरगे, शितल कुरले, राधा खरे, सन्मती टोपन्नावर यांना निवडपत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्षपदाचा चार वर्षाचा कार्यकाळ यशस्वी पूर्ण केल्याबद्दल जयराज कोळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दगडू माने, अनिस मुजावर यांची भाषणे झाली. आशिष शिंदे, समाधान हेगडकर यांनी बैठकीचे नियोजन केले.