नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा शनिवारी मेळावा

नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा शनिवारी मेळावा

नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या
माजी विद्यार्थ्यांचा शनिवारी मेळावा

डॉ. यशवंतराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर, ता. २३ ः बी. एन. पाटणकर ट्रस्ट संचलित नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या वाटचालीची माजी विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी शनिवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजता महास्नेह मेळावा आयोजित केला आहे. त्यात सुमारे १५०० विद्यार्थी सहभागी होतील. या मेळाव्यात नव्या शैक्षणिक धोरणाबाबत नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आर. ए. तथा बाळ पाटणकर आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन जरग यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
हायस्कूलच्या क्रीडांगणावर होणाऱ्या मेळाव्यात ज्येष्ठ शिक्षकांचा आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ‘बहुजन हिताय व बहुजन सुखाय’ ब्रीद घेवून सन १९५५ पासून ट्रस्टच्या माध्यमातून हायस्कूल आणि अभिनव बालक मंदिराची सुरूवात झाली. हायस्कूलच्या माध्यमातून अनेक नामवंत विद्यार्थी घडले असून, ते विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असल्याचे पाटणकर यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी आतापर्यंत ७०० जणांनी नोंदणी केली आहे. आम्ही माजी विद्यार्थी हायस्कूलमधील शैक्षणिक सुविधा वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जरग यांनी सांगितले. ट्रस्टचे सचिव एन. एल. ठाकूर, चंदू ओसवाल, सुर्यकांत सोनुले, रवी बावडेकर, मंगेश गुरव आदी उपस्थित होते.

चौकट
‘कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर’
सध्या हायस्कूलची पटसंख्या एक हजार आहे. विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर आमच्या ट्रस्टचा भर आहे. माजी विद्यार्थी कक्ष स्थापन केला जाणार आहे. त्याद्वारे विविध सामूहिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com