गडहिंग्लजला उद्या चिंतन बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला उद्या चिंतन बैठक
गडहिंग्लजला उद्या चिंतन बैठक

गडहिंग्लजला उद्या चिंतन बैठक

sakal_logo
By

गडहिंग्लजला उद्या चिंतन बैठक
गडहिंग्लज : सद्‍गुरू वामनराव पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यस्मरण सोहळा व जन्मशताब्दी वर्ष कार्य चिंतन बैठकीचे येथे आयोजन केले आहे. जीवन विद्या मिशन मुंबई व येथील ज्ञानसाधना केंद्र व उपकेंद्रातर्फे गुरुवारी (ता. २५) आजरा रोडवरील स्वयंवर सांस्कृतिक भवनात (मंत्री हॉल) ही बैठक होत आहे. जीवन विद्याचे माजी अध्यक्ष व उद्योजक शैलेश जोशी व सागर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती आहे. सकाळी दहा ते एक या वेळेत बैठक होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
---------------------------------------------------
gad233.jpg
04443
गडहिंग्लज : ओंकार महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात संगीता लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.

‘ओंकार’मध्ये पर्यटनावर व्याख्यान
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे ऐतिहासिक पर्यटन या करिअर ओरिएंटेड अंतर्गत स्थानिक पर्यटन या विषयावर व्याख्यान झाले. प्रा. संगीता लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. स्थानिक पर्यटनाचे महत्व, विविध ऐतिहासिक स्थळे, त्यातून रोजगाराच्या संधी, प्रेरणा आदी अनुषंगाने त्यांनी माहिती दिली. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचेही भाषण झाले. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. प्रा. प्रशांत कांबळे यांनी स्वागत केले. अमृता हातकर यांनी आभार मानले. प्रदीप पकाले, बसवराज कांबळे, विलास बागडी, ऋषीकेश सावरे, विनोद सावरे, सरिता मिसाळ, अंकीत घोटणे, तेजस्विनी देसाई, स्नेहल कुरळे यांनी नियोजन केले होते.
-----------------------------------------------------
‘शिवराज’मध्ये दोन दिवस शिबिर
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थ्यांना जुनी कागदपत्रे, पासपोर्ट, जातीच्या दाखल्यांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे काढताना होणारी धावपळ व येणाऱ्‍या अडचणींचा विचार करून २७ व २८ मे (शनिवार व रविवारी) रोजी विशेष सेवा शिबिराचे आयोजन केले आहे. सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या पुढाकाराने हे शिबिर होत आहे. यामध्ये टी.सी., शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, वर्तणुकीचा दाखला, जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे व अन्य आवश्यक दाखले सकाळी नऊपासून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना विशेष सेवा देण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेतल्याची माहिती रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर यांनी दिली. आजी- माजी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.