दिल्लीचे कार्यक्षेत्र सर्वांच्या सहकार्यामुळेच

दिल्लीचे कार्यक्षेत्र सर्वांच्या सहकार्यामुळेच

gad234.jpg
गडहिंग्लज : एम. एल. चौगुले यांचा सत्कार सदाशिव कावणेकर यांच्याहस्ते झाला. डी. के. मायदेव व ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
------------------------------------------
दिल्लीचे कार्यक्षेत्र सर्वांच्या सहकार्यामुळेच
एम.एल. चौगुले; गडहिंग्लजच्या सभासदांकडून सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे हितचिंतक सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहक यांचा अढळ विश्वास, सकारात्मक पाठबळ व सहकार्यामुळेच संस्थेला दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात किंबहुना देशाच्या राजधानीत शाखा विस्ताराची संधी मिळाली आहे, असे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी नमूद केले.
श्री रवळनाथ संस्थेच्या कार्यक्षेत्रात दिल्लीचा समावेश झाल्याबद्दल सभासदांतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ सभासदांनी उत्स्फूर्तपणे भेटून श्री. चौगुले यांचा सत्कार केला. श्री काळभैरी व श्री गुड्डाई वॉकींग ग्रुपतर्फे हा कार्यक्रम झाला. श्री. चौगुले म्हणाले, ‘महाराष्ट्रातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी नोकरीनिमित्त दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्यांनाही श्री रवळनाथच्या सेवा आणि सुविधांचा लाभ मिळावा अशी अपेक्षा संस्थेचे मानद ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली होती. त्यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळेच हे शक्य झाले. दिल्ली’चे आधारकार्ड असलेल्या कुठल्याही राज्यातील नागरिकांना संस्थेचा सभासद होता येईल. ठेवी ठेवण्यासह दिल्लीत घर बांधकाम, भूखंड खरेदीसाठीही कर्ज घेता येईल.’
सदाशिव कावणेकर यांचेही भाषण झाले. विजय आजरी, पी.व्ही. सरदेसाई, काशिनाथ शेट्टी, रामकृष्ण शेंडे, मनोहर शेळके, रामचंद्र पोवार, भिमराव शेवाळे, दिपक कुलकर्णी, वसंत सावंत, सुभाष कदम, देसाई, विजय तेलंग, ए. आर. पाटील, बाबुराव मोरे, जगदीश देवार्डे, संदीप शिंदे, शशिकांत ताशिलदार उपस्थित होते. प्रशासन अधिकारी सागर माने यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मायदेव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com