
डीकेटीई आयटीआयच्या ४२ विद्यार्थ्यांची निवड
ich232.jpg
04464
इचलकरंजी ः डीकेटीईच्या आयटीआयच्या निवड झालेल्या ४२ विद्यार्थ्यांसह डॉ. सपना आवाडे व मार्गदर्शक शिक्षक.
डीकेटीई आयटीआयच्या ४२ विद्यार्थ्यांची निवड
इचलकरंजी, ता. २३ ः येथील डीकेटीई संस्थेच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील आयटीआयच्यावतीने नुकतेच कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यातील समाविष्ट कंपन्यांनी १७१ विद्यार्थ्यांची इंटरशिप व जॉबसाठी नियुक्ती केली आहे. यापैकी डीकेटीई आयटीआयच्या ४२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
यावर्षी डीकेटीई संस्थेच्या आयटीआयतर्फे कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन केले होते. यामध्ये लुकास टीव्हीएस लि. चाकण, वॅरॉक इंजिनिअरिंग लि. चाकण, टेनेको क्लीन एअर इंडिया प्रा. लि. चाकण व टाटा मोटर्स क्वेस कार्पोरेशन पुणे या नामांकित कंपन्यांचा सहभाग होता. तांत्रिक फेरी व एचआर मुलाखत या निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे आदिंनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी, आयटीआयचे प्राचार्य डी. डी. पाटील, पॉलिटेक्निकचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एम. बी. चौगुले, आय. टी. आयचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर व्ही. आर. मुल्लाणी यांचे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.