डिपेक्स स्पर्धेत शरद इन्स्टिट्यूट अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिपेक्स स्पर्धेत शरद इन्स्टिट्यूट अव्वल
डिपेक्स स्पर्धेत शरद इन्स्टिट्यूट अव्वल

डिपेक्स स्पर्धेत शरद इन्स्टिट्यूट अव्वल

sakal_logo
By

jsp2320
04474
यड्राव ः येथे डिपेक्स २०२३ स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन अनिल बागणे, प्राचार्य डॉ. एस.ए. खोत, प्राचार्य बी.एस. ताशीलदार आदींच्या उपस्थित कले.
-------------
डिपेक्स स्पर्धेत शरद इन्स्टिट्यूट अव्वल
प्रथम क्रमांकासह विद्यार्थीनींसाठीचा विशेष पुरस्काराचाही मानकरी
दानोळी, ता. २३ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विविध विभागातील विद्यार्थी राज्यस्तरीय डिपेक्स २०२३ अंतर्गत झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत विजेते ठरले. वुमन अॅण्ड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हा विशेष पुरस्कारही शरदच्या विद्यार्थ्यांना मिळाला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, डिपेक्स व सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेमध्ये यश संपादन केले. सिव्हील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या युज ऑफ नॅचरल फायबर्स इन ब्रिक्स या प्रोजेक्टला प्रथम क्रमांक मिळाला. इंडस्ट्रीयल अॅटोमाझेशन या थीम अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी फॅशन उद्योगात आयओटीचा वापर करुन क्लग रिफलेक्टर प्रोजेक्ट या प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक मिळाला. वेस्ट मॅनेजमेंट या थीम अंतर्गत इलेक्ट्रीकल डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी ऑईल स्किमर हा प्रोजेक्ट सादर केला. त्याला द्वितीय क्रमांक मिळाला. स्पर्धेत मुलींसाठी वुमन अॅण्ड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन (WATI) हा विशेष महिला पुरस्कार ठेवला होता. यामध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातून ४८ विद्यार्थ्यांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थीनींना हा विशेष पुरस्कार मिळाला. त्यांनी एफिसिंअट स्मार्ट ब्रेसीस फॉर लाईफ थ्रेटनिंग डिसीस ऑफ प्रॅराप्लेजीया (पॅरेलिसिस झालेल्या रुग्णांना चालण्यासाठी आधुनिक सुविधा) हा प्रोजेक्ट सादर केला होता. संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.