दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर शक्य
दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर शक्य

दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर शक्य

sakal_logo
By

दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर शक्य
आजरा तालुका; ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता, इच्छुक उमेदवारांत निरुत्साह
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २३ ः आजरा तालुक्यात जूनमध्ये मुदत संपणाऱ्या दहा ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. प्रभाग आरक्षण, मतदार यादी असे बरेच काम बाकी असल्याने निवडणुका सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये होतील. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी उमेदवारीसाठी तयारी सुरू केली होती. त्या दृष्टीने फिल्डिंग लावली होती. त्यांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.
तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार महिन्यांपूर्वी झाल्या. सध्या पेरणोलीसह मेंढोली, इटे, देऊळवाडी, बुरुडे, हरपवडे, सुलगाव, चांदेवाडी, वेळवट्टी, मसोली या गावांच्या निवडणुका होणार होत्या. या ग्रामपंचायतींची मुदत जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे या गावातील राजकारण गतिमान झाले आहे. नेतेमंडळी, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू होत्या. इच्छुकांनी उमेदवारीसाठी तयारी सुरू केली होती. त्या दृष्टीने फिल्डिंग लावली जात आहे; पण निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक मंडळींमध्ये निरुत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. या गावातील निवडणुकीसाठी आवश्यक गोष्टींची तयारी झालेली नाही. प्रभागाचे आरक्षण व्हायचे आहे. त्याचबरोबर प्रभाग रचनेनुसार मतदार यादीचे काम बाकी आहे. हे काम झाल्यावर प्रारुप मतदार यादी प्रसिद्घी, त्यानंतर हरकती, त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. हे काम वेळखाऊ असे आहे. तोपर्यंत पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये होतील, असे समजते. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे.
--------------
जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही लांबणीवर?
ग्रामपंचायतींबरोबरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. आरक्षण, मतदार यादी यांसह अन्य तांत्रिक बाबींमुळे त्या पुढे जाणार आहेत. या निवडणुकाही ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता आहे.