इचलकरंजीत लाकूड ओढण्याच्या शर्यतीचा थरार

इचलकरंजीत लाकूड ओढण्याच्या शर्यतीचा थरार

इचलकरंजीत लाकूड ओढण्याच्या शर्यतीचा थरार
३० मेपासून प्रारंभ; बेंदूर सणानिमित्त जनावर प्रदर्शनांचेही आयोजन

इचलकरंजी, ता. २३ ः येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळातर्फे कर्नाटक बेंदूर सणानिमित्त वस्त्रनगरीतील शतकोत्तर परंपरा असलेल्या भव्य लाकूड ओढण्याच्या शर्यतींचे आयोजन केले. ३० व ३१ मे आणि १ जून रोजी डीकेटीई नारायण मळा येथे या शर्यती होणार आहेत. ३ जून रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी दिली.
लहान गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यती ३० मे रोजी होणार आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांकास ७५ हजार रुपये, शिल्ड व चांदीची फिरती गदा, द्वितीय क्रमांकास ५१ हजार रुपये व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास ३१ हजार रुपये व शिल्ड अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ३१ मे रोजी मोठ्या गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यती होणार आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांकास १ लाख रुपये शिल्ड व चांदीची फिरती गदा, द्वितीय क्रमांकास ७५ हजार रुपये व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास ५१ हजार रुपये व शिल्ड अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. १ जून रोजी सुट्टा बिनदाती बैल पळवणे स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ११ हजार रुपये व शिल्ड, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये व शिल्ड बक्षीस देण्यात येईल.
श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात त्याचबरोबर ३ जूनला जनावरांचे भव्य असे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता प्रदर्शनाचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. प्रदर्शनात विविध जातीवंत खिल्लार जनावरे पाहण्यास मिळणार आहेत. लाकूड ओढण्याच्या शर्यती व जनावर प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ तसेच बेंदूरनिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम ५ जूनला गावभागातील जुनी गावचावडी महादेव मंदिर चौक येथे होणार आहे. बक्षीस वितरण माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com