सरस्वतीबाई गौड वसतिगृह माजी विद्यार्थी मेळावा

सरस्वतीबाई गौड वसतिगृह माजी विद्यार्थी मेळावा

सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण
विद्यार्थी वसतिगृहात मेळावा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आदर्श जीवन जगण्याचा संस्कार देतानाच शिस्त व संस्काराचे धडे सारस्वत बोर्डिंगने विद्यार्थ्यांच्या अंगी रूजविले आहेत, असे साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी सांगितले. दसरा चौक येथील श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृहात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे होते.
संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर म्हणाले, ‘सारस्वत विद्यार्थी वसतिगृहाला १०८ वर्षांची परंपरा आहे. आजपर्यंत गरजू व हुशार विद्यार्थ्याना शैक्षणिक सुविधा देण्याचे काम सारस्वत समाजाने केले आहे.’ यावेळी संस्थेचे सचिव सुधीर कुलकर्णी, सहसचिव अमित सलगर, संजय वाघापूरकर, गजानन आसगेकर, धनंजय देशपांडे, सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर, उपाध्यक्ष संजीव बोरकर, सचिन शानबाग, डॉ. यशस्विनी जनवाडकर उपस्थित होते. दरम्यान, संस्थेच्या ७५ वर्षावरील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आनंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आभार सुधीर कुलकर्णी यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com